शांततेच्या मार्गाने केले रस्ता रोको व आंदोलन ...
आतूल नवघरे
लाखपुरी: ९, मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे सकल मराठा क्रांती समाज लाखपुरी च्या वतीने महाराष्ट्र बंदच्या प्रार्श्वभुमीवर मुर्तिजापुर ते दर्यापुर मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते . आंदोलन व रस्ता रोको शांततेने करण्यात आले.रस्ता रोको मध्ये लाखपुरी येथील सकल मराठा क्रांती मोर्चा मधील सर्व समाज बांधव उपस्थीत होते. बंद दरम्यान जड वाहतुकीचे वाहन , इतर सर्व वाहने वाहतुक ठप्प करण्यात आले होते. बंद दरम्यान ज्यांना वैद्यकीय उपचारांची गरज होती अशा वाहनाना तातकाळ काढण्यात आले , शेतकरी व मजुर वर्गाला रस्ता रोको दरम्यान जावु देण्यात आले. लाखपुरी येथे घटनास्थळी मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशनचे पि.एस . आय. दिपक सोळंके साहेब , एस.पी. नारायण , प्रशांत सरोदे , महेश पिंजरकर इत्यादी मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस ची यंत्रणा घटना स्थळी उपस्थीत होती.लाखपुरी येथील या मोर्चाचे निवेदन ठाणेदार मुर्तिजापुर ग्रामीण यांना देण्यात आले .
व सर्व समाज बांधव मुर्तिजापुर येथे सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक , शिवाजी चौक मुर्तिजापुर येथे एकत्रीत येवुन मुख्य रस्त्यांनी लोकप्रतिनी आमदार साहेब यांना शांततेच्या मार्गाने पायी चालत जावुन शांततेच्या मार्गाने मा. आमदार साहेब यांच्या घरा समोर ठिय्या आंदोलन करुन आमदार साहेब यांना देण्यात आले. मोर्चे मध्ये सकल मराठा बांधवाच्या कडुन शासना समोर प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या १.मराठा समाजाला तात्काळ नौकरी व शिक्षणामध्ये आरक्षण लागु करणे , २. शेत-यांची कर्जमाफी करणे ,३.कुषी पंपाना तात्काळ विद्युत कनेक्शन देणे , इत्यादी मागण्याचे निवेदन ठाणेदार मुर्तिजापर ग्रामिण , आमदार मुर्तिजापुर यांना देण्यात आले.

