इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारताचे संविधान जाळण्याच्या मानसिकतेविरुद्ध संविधानाची पूजा करून त्याचा सन्मान करण्यासाठी आमचे लोकशाही मार्गाने बंड असेल व संविधानाला हात घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल, असे प्रतिपादन निर्धार मेळाव्याचे मुख्य आयोजक अशोक राजे सरवदे यांनी केले.
उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात उमरगा, लोहारा तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती निमीत्त निर्धार मेळावा आयोजीत करण्यात आला होता.या
प्रसंगी ते बोलत होते.या मेळाव्याचे उदघाटन आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड.डि.एम.सरवदे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार,जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील,
फकीरा दलाचे महाराष्ट्र प्रमुख सतिश कसबे,प्राचार्य दिलीप गरुड,दिलीप भालेराव,पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला,ज्योषीलाताई लोमटे,हाणमंत दणाणे,
बबन बनसोडे,संजय सरवदे,महादेव गिरी,बालाजी सरवदे,केशव सरवदे,महादेव वाघमारे,सुखदेव होळीकर,तुळशीराम देडे,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन केशव सरवदे यांंनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी मानले.या मेळाव्यास डॉ.चंदशेखर गायकवाड,कविता सरवदे,कुमार थीटे,रणजीत गायकवाड,शमशोद्दीन जमादार,बाळु माशाळ,बाळु बुंदगे,यांच्यासह उमरगा,
लोहारा तालुक्यातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते उपस्थीत होते.
