यवतमाळ :- अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने स्थानिक स्व.नारायणराव माकडे शाळा येथे दोन गटामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग 5 ते 8 स्त्री-पुरुष समानता तर वर्ग 9 ते 12 करीता मेक इन इंडिया या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून अतिशय सुंदर चित्र काढून स्पर्धा यशस्वी केली. या प्रकल्पाकरीता संस्थेच्या शिक्षकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. वर्ग 5 ते 8 या गटामध्ये प्रथम क्रमांक कृष्णा बावणे, द्वितीय कुलविल कौर तसेच तृतीय क्रमांक गौरी रेड्डी यांनी प्राप्त केले. तर गट क्रमांक 9 ते 12 मध्ये प्रथम पुरस्कार संजय देशपांडे, तृतीय पुरस्कार हितेश मानूर यांनी प्राप्त केले. संस्थेच्या मुख्याध्यापकाच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे नगर परिषद संजय गांधी शाळा क्र. 18 मध्ये वर्ग 1 ते 4 या गटामध्ये पर्यावरण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या दोन्ही स्पर्धेमध्ये जवळपास 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आकर्षक व नयनरम्य चित्र विद्यार्थ्यांनी बनविले. त्यामध्ये ऋषीकेश अलोणे, द्वितीय पुरस्कार आचल इंगोले, तृतीय पुरस्कार देवकांत पटेल यांनी प्राप्त केले. मुख्याध्यापक सौ.ज्योती सावळकर, शिक्षक संजय चुनारकर यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेच्या प्रांगणात अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून हरगोविंद चांडक यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊनच्या शाखेच्या अध्यक्षा सौ.दीपा जोशी, सचिव सौ.ममता चांडक, कोषाध्यक्ष विमलेश मनक्षे, ज्योती राठी, मंजू राठी, मनीषा बागडी, विद्या दुप्पड, शिला भुतडा, सुनीता जोशी, संगीता वैष्णव, ज्योती शर्मा, संगीता चांडक, वर्षा राठी आदींनी अथक परिश्रम घेतले. वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संजय गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्विकारली.

