वेदांत नारे
दहिहांडा :- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला दहिहांडा येथील सकल मराठा समाज बांधवाचा दहिहांडा बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. नोकरी व शिक्षणात आरक्षण लागू करावे ,या मागणीसाठी सकल मराठा बांधवांनी दहिहांडा बंद चे आवाहन केले होते. सकाळी सर्व जातीधर्माच्या नागरिकांना बंदचे आवाहन केले. त्यामुळे सर्वच व्यापार्यानी आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली .अशाप्रकारे दहिहांडा बंदला शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला आहे
