मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद




देवणी :-  मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला देवणीत उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. देवणी शहर व तालुक्यात  कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आठ पासूनच कार्यकर्ते हातात भगवी पताका घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले होते. या बंदला देवणी व तालुक्यातील वलांडी,बोरोळ,लासोना,व ईतर गावातही प्रतिसाद मिळाला.बंद दरम्यान देवणीतील बाजार, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप व सर्व खाजगी कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. तसेच एसटी महामंडळाने सकाळपासूनच बस बंद ठेवल्याने बसस्थानक ओस पडले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post