अर्चना विद्यानिकेतन लाखपूरी येथील गैरप्रकार अध्यक्षांना भोवला



  • अखेर अध्यक्ष पायउतार : झाला होता भ्रष्टाचाराचा आरोप


मूर्तिजापूर :- तालुक्यातील लाखपूरी येथील अर्चना विद्यानिकेतन यासंस्थेचे अध्यक्ष ज. गो. चव्हाण यांनी मनमानीपणे कारभार करून संस्थेत ९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार संस्थेचे सदस्य लक्ष्मण दौलत साबळे यांनी सहायक धर्मादाय आयुक्त अमरावती, यांच्याकडे केली होती सदर्हू प्रकरणात संस्था अध्यक्ष ज. गो. चव्हाण दोषी आढळल्याने त्यांना आपल्या पदावरून कायमस्वरूपी काढून टाकण्याचा निर्णय ज्वाईंट चारीटी कमिशनर अमरावती, यांनी ९ जुलै रोजी दिला आहे.
     संस्था सदस्य लक्ष्मण साबळे यांनी ज्वाईंट चारीटी कमिशनर अमरावती यांचेकडे सन २००९ मध्ये भक्कम पुराव्यानीसी संस्था अध्यक्ष ज. गो. चव्हाण यांच्या विरुद्ध  दाद मागितली होती या प्रकरणी उपरोक्त विभागाने दि. ९ जुलै रोजी निकाल देत चव्हाण यांनी बोगस व्हाऊचर करून ९ लाखांचेवर गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाले असल्याने चव्हाण यांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कलम ४१/ड (१)(अ),(क) आणि (ड)अन्वये कायमस्वरूपी सदस्य व अध्यक्ष पदावरू काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
       संस्था अध्यक्ष ज. गो. चव्हाण यांनी संस्थेतून आर्थिक लाभ कसा मिळविता येईल या उद्देशाने संस्था सचिव सुधीरचंद्र आबासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष एम. पी. इंगळे, सदस्य लक्ष्मण दौलत साबळे व विश्वास पु. गावंडे यांना विश्वासात नघेता संस्थेतून कमी करुन स्वतःच्या परीवारातील सदस्यांची नियुक्ती केली होती, त्याच प्रमाणे आपल्या परिवारातील काही व्यक्तींना नियमबाह्य संस्थेत नौकरीत लावले या नियमबाह्य कारभाराची माहिती मिळविण्यासाठी व संस्थेचे व्यवहार तपासणीसाठी वरील सदस्यांनी अकोला धर्मादाय कार्यालयाकडे सन २००४ मध्ये अर्ज दाखल केला होता. व संस्थेत संगनमत करून आर्थिक लाभ घेत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु याचा उपयोग नझाल्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागितली असता या खंडपीठाने उपरोक्त चारही ट्रस्टी यांना कायम ठेऊन १३ डिसेंबर २०१५ ला संस्थेचे रेकॉर्ड तपासणी करण्याची परवानगी दिली. या संदर्भात तपासणी अहवाल संबधितांकडे पाठविण्यात आला होता.
     सदर संस्थेत वाद असल्याने या संस्थेत प्रशासनाने प्रशासकाची नेमणूक केली होती प्रशासकीय कार्यकाळ ३१ डिसेंबर २०१६ मध्ये संपुष्टात आल्याने संस्थेचे व्यवस्थापन मुळ कार्यकारी मंडळाकडे सोपविण्यात यावा अशी विनंती पत्राद्वारे केली होती तेव्हा शिक्षण उपसंचालक अमरावती, यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांना आदेशीत करण्यात आले होते, परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी दिरंगाई करीत सदर तक्रारकर्यांना तोंडी आदेश देऊन आपण शाळा व्यवस्थापन करु शकता असे सांगितले.
   दरम्यान लक्ष्मण साबळे हे ३ जुलै रोजी व्यवहाराची माहिती घेण्या करीता शाळेत गेले असता साबळे यांना चपराशाच्या मदतीने शाळा परिसरातून हाकलून दिले व त्यांच्या विरुद्ध शाळेचे रेकॉर्ड फाडल्याची तक्रार दाखल केल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.

सदर चौकडींनी आमच्या विरूद्ध कुभांड रचले आहे ज्वाईंट चारीटी कमिशनर यांच्या निर्णयाला आम्ही आव्हान देत जिल्हा न्यालयात दाद मागणार आहोत.
     उलट यांनीच संस्थेच्या नावाने बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे बोगस खाते उघडले आहे आणि लोकांकडून बेकायदेशीर शुल्क वसूल केले असून आम्ही यांच्या विरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली आहे, २२ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या निवडणुकी नुसार आम्हीच अध्यक्ष सचिव आहोत
प्रेमसिंग गुलाबसिंग परमार
अधक्ष,
देवलसिंग उमरावसिंग राजपूत
सचिव,
अर्चना विद्यानिकेतन लाखपूरी

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post