इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी संस्थेमार्फत बार्टीचे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से.),मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,सहाय्यक प्रकल्प संचालिका सुजाता पोहरे,प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 जुलै ते 22 जुलै हा सप्ताह "समतादूत वृक्षारोपण सप्ताह" म्हणून साजरा केला जात आहे.
या उपक्रम अंतर्गत लोहारा तालुक्यातील नागराळ येथील स्मशानभुमित वृक्षारोपन करण्यात आले.
या सप्ताहानिमित्त तालुक्यातील माध्यमिक विद्यालय,महाविद्यालय,शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय परिसर,शासकीय कार्यालय ((तहसिल/पंचायत समिती)शासकीय वस्तीगृह/निवासी शाळा या ठीकाणी वृक्षारोपन करण्यात येणार आहे.नागराळ येथील वृक्षारोपन कार्यक्रमात समादुत नागनाथ फुलसुंदर व किरण चिंचोले यांनी नागरिकांना वृक्षांचे महत्व पटवून दिले,झाडे लावा झाडे जगवा, झाडे वाढवा अश्या घोषणा देत सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती,पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नव्हते,तरीही समतादूतांनी पावसात भिजतच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न केला.यावेळी बाहेरून आलेले समतादूत पावसात भिजत आपल्या गावासाठी कार्य करतात तर आपण का नको असे समजून गावातील नागरीक समोर येवुन समतादूतासोबत स्मशानाकडे निघाले, स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल साचलेले असतानासुद्धा सर्वांनी स्मशान गाठले आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न केला.यावेळी ग्रामस्थांनी समतादूताचे मनापासून आभार मानले यावेळी कुलदीप गोरे यांनी हा उपक्रम सामाजिक प्रबोधनपर उपक्रम असल्याचे सांगुन उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.या कर्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
