महाराष्ट्रातील सर्व जुने रस्त्याच्या कामाची चौकशी करुन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सबंधीत कंत्राटदारावर कार्यवाही करावी — बसव प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सर्व जुने रस्ते कंत्राटदार यांच्या कामाची चौकशी करुन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सबंधीत कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी,
अशा मागणीचे निवेदन बसव प्रतिष्ठाण संस्था मुरुमचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी उमरगा
तहसीलदार मार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्री,मुंबई
यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्रातील रस्ता कामाचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे दिसुन येत आहे.कंत्राटदार आपले काम प्रामाणिकपणे बजावत नसल्यामुळे नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहे.
यात प्रमुख बाबी असे की,रस्ता काम मंजूर झाल्यानंतर अथवा रस्ता काम चालू झाल्यानंतर लागलीच त्याची कालावधी ठरवली जाते.पण मुळात असे न होता रस्ता पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याची कालावधी ठरवावी,रस्ता दुरुस्ती कालावधी 3 वर्षे मुदत असले तरी मुळात तो रस्ता बनवयलाचा ठेकेदार 1 ते दीड वर्ष घालवतो.त्यानंतर राहिले फक्त दीड वर्ष या कालावधीत रहदारी मुळे रस्ते तर खराब होणारच पण त्याची दुरुस्ती कालावधीही संपलेली असते.
महाराष्ट्रात असे काही कंत्राटदार आहेत जे की,फक्त टेंडर भरणे आणि आपले कमिशन काढून घेणे व काम दुसऱ्याला देऊन मोकळे होणे.त्यामुळे कामाचा दर्जा घसरत आहे.दुसरा मुद्दा असे की,अनेक व्यक्तींनी सुशिक्षित बेरोजगार नावानी कंत्राटदार परवाने काढले आहेत.आज ते सुशिक्षित बेरोजगार नसून बलाढ्य श्रीमंत झाले आहेत.आणि रस्ता कामावर वेळ कमी आणि वयक्तीक व्यवसायात वेळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आणि मुळात त्यांचे व्यवसाय हे संबधीत कामाला लागणाऱ्या वस्तूचेच आहे मग ते वीट,वाळू,खडी,सिमेंट....यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी आणखी वाढत आहे.
विविध समस्यांना अनसुरून खालील मागणी साठी आम्ही निवेदन देत आहोत.
1) बांधकाम विभागाशी निगडित सर्व विभागातील कंत्रटदार यांना आता पर्यंत दिलेले काम वेळेत पूर्ण झाले की नाही याची चौकशी लावणे,नसेल झाले तर परवाने रद्द करणे.
2) वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालु ठेवलेले कंत्राट परवाने रद्द करणे.
3) टेंडर भरतात आणि काम दुसऱ्याला देतात असे परवाने रद्द करणे.
4) काम देऊनही अनेक वेळा प्रशासकीय नोटिसा देऊन काम वेळेत पूर्ण न केलेले परवाने.
5) काम न करता काम झाले असे दाखवून बिले उचलले परवाने रद्द करणे.
6) मूळ संपत्ती व कंत्राटदारीच्या हिशोबाने आतापर्यंत ची संपत्ती आणि आता जमलेली मूळ संपत्ती.
आमच्या वरील सहा मागणीवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा दि.16.08.2018 पासून मी स्वतः रामलिंग काशिनाथ पुराणे रा. मुरूम ता.उमरगा जि. उस्मानाबाद,उमरगा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास सुरुवात करेन व त्याबरोबर,जनहित याचिका ही दाखल करण्यात येईल.या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी,उस्मानाबाद,पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद,विरोधी पक्ष नेते,सर्व राजकीय पक्ष,केंद्रीय सतर्कता आयोग,दिल्ली,यांना देण्यात आल्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post