उमरखेड पालिका सदस्यांची पावसाळी अधिवेशनास भेट विविध कामाच्या विकासनिधी करीता मंत्र्याना निवेदन सादर


उमरखेड प्रतिनिधी :- मागील दोन वर्षापुर्वी नगरपालिका क्षेत्रात वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्यात आला त्यामुळे वाढीव क्षेत्रासह शहरासाठी विकास निधी मिळावा म्हणुन काल ( ता .१७ ) रोजी नगरअध्यक्षाने पालिका सदस्यासमवेत पावसाळी अधिवेशना दरम्यान मंत्र्यांची भेट घेवुन विकास निधी देण्याची मागणी केली .

 येथील नगर पालिकेमध्ये  विविध विकास कामे झपाट्याने सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे मागील 12 एप्रिल रोजी कोट्यवधी रुपायाच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उमरखेड ला आले होते यावरून शहराच्या विकासाचा प्रत्यय येतो
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश के हर हिस्से का विकास ही संकल्पना सध्या शहरात सुरू असल्याचे वास्तव आहे येथे सर्वच जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात सर्वच क्षेत्रात अन सर्वच स्तरावर विकासकामे झाली पाहिजे हाच मूळ उद्देश ठेऊन येथील पालिका सदस्य काम करीत आहेत परंतु विकास कामे करताना निधी लागतो हाच निधी राज्य शासनाकडे  मागण्या करिताआमदार राजेंद्र नजरधने तसेच  येथील नगर परिषद अध्यक्ष नामदेव ससाणे मुख्याधिकारी गणेश चव्हाण उपाध्यक्ष अरविंद भोयर स्थायी समिती सदस्य नितीन भुतडा पाणी पुरवठा सभापती दिलीप सुरते शिक्षण सभापती गजेंद्र ठाकरे नगरसेवक प्रकाश दुधेवार नगर अभियंता संदीप वानखेडे आदी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनास भेट देऊन संबंधित मंत्र्याना निधी मागणी संदर्भात निवेदन सादर केले यामध्ये नगर विकास मंत्री रणजित पाटील अल्पसंख्याक कल्याण मंत्री विनोद तावडे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यवतमाळ जिल्हा पालकमंत्री मदन येरावार याची भेट घेऊन राज्याच्या विविध विकास योजना ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना ,अल्पसंख्याक कल्याण योजना ,नागरोत्थान योजनेसह विविध योजनेच्या माध्यमातून विकास निधीची मागणी करण्यात आली असल्याचे यावेळी नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांनी सांगितले.
सोबत फोटो
नगरविकासमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेवुन विकास निधीची मागणी करतांना नगरअध्यक्ष नामदेव ससाने

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post