कोल्हापूर: दोन बस समोरासमोर धडकल्या; १ ठार, १५ जखमी


कोल्‍हापूर :- गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे आज सकाळी नऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ६२ वर्षीय महिला ठार झाली असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. तर १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कोदे-रंकाळा आणि विजयदूर्ग-पुणे या दोन एसटी बस कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून जात होत्या. लोंघे येथील वळणावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बेबी वाळू मुल्लानी (वय ६२, रा. तिसंगी) या ठार झाल्या. तर कोदे-रंकाळा बसचा चालक आणि एक पोलीस गंभीर जखमी आहे. इतर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातामुळं या मार्गावर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post