अकोला :- अकोल्यातील किशोर खत्री बहुचर्चित हत्याकांडाच्या अंतिम युक्तिवादादरम्यान सरकार पक्षातर्फे दोन दिवस युक्तिवाद चालला. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव यांच्यासमोर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, घटनेच्या दिवशी मृतक किशोर खत्री व आरोपी रणजित चुंगडे हे मीटिंग साठी बालाजी मॉल मध्ये एकत्र आले होते. दुपारी 12 वाजता नंतर चुंगडे व खत्री एकत्र होते. यानंतर दोघेही चुंगडेच्या सफारी गाडीतून निघून गेले अशी माहिती सांगणारे प्रत्यक्षदर्शीय साक्षीदार समोर आले आहेत. दोघेही निघून गेल्यानंतर 1 वाजून 17 मिनिटांनी अशोक धानुका यांचे किशोर खत्री यांच्या सोबत बोलणे झाले तेव्हा खत्री यांनी सांगितले होते की, मै रणजित पहेलवान के साथ मे सोमठाणा के खेत मे हू , आप निकल जावो..तसेच दुसरा साक्षीदार प्रवीण कुशवाह याच्या साक्षीमधून चुंगडे आणि खत्री सोबत होते हे समोर आले. तसेच वोडा फोनचा सिडीआर रिपोर्ट तसेच वोडा फोनच्या अधिकाऱ्यांची साक्ष गुन्ह्यातील सत्यता समोर आणण्यासाठी हे पुरावे पुरेशे आहेत असे उज्वल निकम म्हणाले. दुपारी 12 नंतर किशोर खत्री हे रणजितसिंग चुंगडेच्या सोबत होते. यानंतर 5 वाजताच्या दरम्यान किशोर खत्री यांचा सोमठाणा शिवारात मृतदेहच मिळाला. आरोपीनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी दरम्यानच्या काळात किशोर खत्री कोठे होते हे सांगण्याची जबाबदारी आरोपींची आहे मात्र आरोपीनी याबाबत अद्याप पर्यन्त कोणताही खुलासा केलेला नाही, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. सरकरपक्षाच्यावतीने आतापर्यन्त सदोष मनुष्य वध, खुनाचा उद्देश आणि लास्ट सीन टूगेदर या मुद्द्यावर प्रभावीपणे मत मांडले. 16 ऑगस्ट ला प्रत्यक्षदर्शीय साक्षीदाराची भूमिका महत्वाची कशी ? यावर युक्तिवाद होणार आहे. यानंतर बचाव पक्षास अंतिम युक्तिवादाची संधी देण्यात येईल. आज सरकारच्यावतीने उज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील गिरीश देशपांडे तर बचाव पक्षातर्फे प्रदीप हातेकर, दीपक काटे, आणि वसीम मिर्जा काम पाहत आहेत.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)
