महिलेची वाहनात विसरलेली पर्स परत करुन लोहारा शहरातील वाहन चालक तयब पठाण यांनी प्रमाणिकपणा दाखविला


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिघी :-  लोहारा तालुक्यातील करजगाव येथील महिला स्वाती शिवहारी कुलकर्णी या हल्ली मुक्काम आळंद  (कर्नाटक) येथे राहतात.ते माहेरी करजगाव येथे आल्या होत्या.व कांही कामानिमित्त माकणी येथुन लोहारा येथे जाण्यासाठी लोहारा शहरातील तयब पठाण यांच्या वाहन क्रं.MH R 1362 मध्ये बसुन आल्या होत्या.व वाहनातुन खाली उतरताना त्यांची पर्स वाहनात पडली.सकाळी वाहन साफ सफाई करताना त्यांना सापडली.ती पर्स उघडली असता त्यामध्ये 18 हजार रुपये किमतीचे झुमके व रोख 900 रुपये होते.हि घटना त्यांनी आपल्या आईस सांगीतली.आईने तयब पठाण यास सांगीतले कि,ज्याची पर्स आहे त्याला परत कर असे सांगीतले. परंतु पर्स द्यायची कोणाला असा प्रश्न पडला.वाहन चालकांनी शोधा शोध केली परंतु पत्ता लागत नव्हता. कांही वेळाने तयब पठाण यास फोन आला आमची पर्स वाहनात सापडली आहे.लागलीच त्यांनी सांगीतले माझ्याकडे आहे,घेवुन जावा असे सांगीतले.
वाहन चालक तयब पठाण यांनी लोहारा पोलीस ठाण्यात ओळख पटवुन या महिलेची पर्स परत केली.यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हाजी बाबा शेख,जमाल ए तांबोळी,शेळके,बोदमवार,शेवाळे,शंकरअाप्पा मुळे, वहाब सीद्दीकी,अदि उपस्थित होते.या
प्रमाणिकपणामुळे वाहन चालक तय्यब पठाण यांचे सर्वत्र कौतुककरण्यात येत अाहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post