- अनेक गावांचा संपर्क तुटला
- शेती खरडून गेली घरांची पडझड
- एसटी बसेस बंद राहिल्याने नागरिकांना सहन करावा लागला त्रास
विलास नसले
मूर्तिजापूर तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले असून नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे आणि पुलांवरून पाणी वाहत असल्याने एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.यामधे मुर्तिजापूर ते कार्लि, अकोली-जहांगीर, कवळा,ऐंडली,खिनखिनी,राजनापूर गावाचा समावेश आहे. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मूर्तिजापूर तालुक्यात पूर्वेकडे चांगलाच पाऊस बरसला असून तालुक्यातील मंदुरा व कार्ली या गावांचा संपर्क तुटला होता. तसेच या गावांना नदी-नाल्याच्या पाण्याने वेढल्यामुळे तेथील नागरिकांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या होत्या. परंतु आज पाणी ओसरल्याने त्यांना इतरत्र हलविण्याची वेळ आली नाही.
तालुक्यातील कुरूम गावाला नाल्याच्या पाण्याने बेटाचे स्वरूप आले होते. या गावात बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात जल भराव झाला होता. तालुक्यातील ग्राम राजनापूर, खिनखिणी, अकोली -जहागीर, कार्लि, मंदुरा, रामटेक आदी गावांचा संपर्क तुटला होता . मूर्तिजापूर तालुक्यात जवळपास 120 मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे.
मागील वर्षी 1 जून ते अकरा जुलै 2017 पर्यंत 163 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला होता. परंतु यावर्षी 1 जून ते 11 जुलै 2018 पर्यंत 451 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. तालुक्यात हातगाव येथे नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने सुभाष कथलकर व संदीप कथलकर यांचे सह अनेक शेतातील पिकांचे नुकसान झाले.
तर नाले फुटल्यामुळे शेकडो एकर शेती खरडून गेली. तालुक्यातील राजनापूर, खिनखिणी, कार्ली, अकोली जहागीर या गावांमधील काही घरांची पडझड देखील झाली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे शासनाकडून केल्या जात असून लवकरात झाल मूर्तिजापूर तालुक्यात जवळपास 120 मिलिमीटर पाऊस झाला असून यामध्ये पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आलेले आहेत .
अनेक नाल्या अनेक नावे एकत्र आल्याने त्यांची धार फुटल्यामुळे अनेक गावातील शेती खरडून गेल्याच्या घटना घडल्या असून पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्राम मंदुरा व ग्राम कार्ली या भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना हलविण्याची वेळ आली होती.
परंतु आज पाणी ओसरल्याने नागरिकांना हलविण्याची परिस्थिती टळली. तालुक्यातील नुकसानीचा सर्वे केला जात असून लवकरच नुकसानीचा अंदाज समोर येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार वैभव फडतरे यांनी सांगितले .



