पंढरपूर :- जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची पुजा करू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पुजेला पंढरपूरला न येण्याचा निर्णय घेतला आहे. पंढपुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि त्याचा वारकऱ्यांना फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री आषाढी पूजेसाठी पंढरपूरला जाणार नाहीत