इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीच्या व निवासस्थानाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असुन पावसाचे पाणी गळत असल्याने सबंधीत अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी राष्टवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीचे व निवासस्थानाचे बांधकाम गेल्या तीन वर्षापासुन सुरु होते.या बांधकामासाठी लागणारे सिमेंट,वाळु,स्टील,
अदि,साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे वापरण्यात येत असल्या बाबतची तक्रार सबंधीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे केली होती.
परंतु सबंधीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन सबंधीत गुत्तेदाराच्या हाताला धरुन निकृष्ठ दर्जाच्या होणाऱ्या कामास मदत केली.
त्यामुळेच इमारतीचे काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात या रुग्णालय व निवासस्थान इमारतीच्या छतावरील पाणी अनेक ठीकाणी गळत आहे.त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह, अधिकारी,कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस च्यावतीने वारंवार निवेदन देवुन,तक्रार अर्ज देवुनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने व या तक्रारीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णालय व निवासस्थानाचे काम निकृष्ठ झाले आहे.
तरी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करुन,पंचनामे करुन संबंधीत दोषी अधिकारी व गुत्तेदारावर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुक्तार चाऊस,
बाळासाहेब लांडगे,विद्यार्थी तालुका अध्यक्ष पृथ्वी जगताप,आश्पाक मुजावर,निहाल मुजावर,अदिंच्या सह्या होते.
