औरंगाबाद: आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू



औरंगाबाद :- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान मंगळवारी विषप्राशन करणाऱ्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५५) यांचा आज मृत्यू झाला. आंदोलनातील हा दुसरा बळी असून त्यामुळं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून सोनवणे यांनी काल विष प्राशन केलं होतं. ते औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी इथं राहणारे होते. कालच त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
याआधी कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांनी नदी उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सरकारचा निषेध म्हणून मराठा संघटनांनी काल महाराष्ट्र बंद व आज मुंबई, ठाणे, पालघर व रायगड बंदची हाक दिली होती. हे आंदोलन सुरू असतानाच सोनवणे यांचा आज मृत्यू झाला आहे.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post