जेवळी येथील जिल्हा सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक रात्रीचा दिवस करुन ऑनलाईन पिक विमा भरुन घेत आहेत.शेतकऱ्यातुन समाधान


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील उस्मानाबाद जिल्हा सहकारी बॅकेचे शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यासाठी राञीचा दिवस करीत ऑनलाईन पीक विमा भरून घेत असल्याने शेतकऱ्याकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.एकही शेतकरी पीक विमा भरण्यावाचून वंचित राहू नये म्हणून संपूर्ण राञन दिवस बॅंकेचे कामकाज सुरू आहे.
    उस्मानाबाद जिल्हा सहकारी बॅक जेवळी या शाखेअंतर्गत माळेगाव,वडगाव वाडी,वडगाव (गां) फणेपूर,विलासपूर पांढरी,सय्यद हिप्परगा,रूद्रवाडी, दक्षिण जेवळी या गावांचा समावेश आहे.गत वर्षी ऑफलाईन पीक विमा घेतला गेला.त्यावेळी या शाखेत 2784 शेतकऱ्यानी पीक विमा भरला होता. परंतु या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याने ऑनलाईन पीक विमा भरणे बंधनकारक केले आहे.परंतु सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पीक विमा भरणे शक्य नव्हते.कोणत्याही बॅंका पीक विमा स्वीकारत नव्हते.त्यामुळे शेतकऱ्याना पीक विमा भरण्यासाठी खूपच मनस्ताप सहन करावा लागला.
     जेवळी येथील महा ई सेवा केंद्र,आपलं सरकार सेवा केंद्र व खाजगी संगणक केंद्रात अशा तीन ठिकाणी ऑनलाईन पीक विमा भरला जात होता.परंतु सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने दिवसभरात मोजकेच फार्म होत आहेत.आजपर्यंत या तीन ठिकाणावरती जवळपास पाचशे पेक्षा जास्त फार्म भरले आहेत.उस्मानाबाद जिल्हा सहकारी बॅकेत सहा दिवसापासून ऑनलाईन पीक विमा घेतले जात आहे. दिवसा सर्व्हर डाऊन मुळे काम थांबत आहे.त्यामुळे या बॅकेचे शाखा व्यवस्थापक एस.व्ही चौधरी यांनी राञीही ऑनलाईन फार्म भरण्याचे काम सुरूच ठेवले आहेत.त्यामुळे सहा दिवसात 634 शेतकऱ्यांचे ऑनलाईन पीक विमा भरून घेतले आहे.या बॅकेच्या कार्यक्षेत्रात जवळपास तीन हजार शेतकरी आहेत. राञीही ऑनलाईन पीक विमा घेत असल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.या कामासाठी बॅकेचे कर्मचारी शाखा तपासणीस व्ही.
एस.पवार,रोखपाल के.एस.माशाळकर,बी.व्ही.घोडके  सुमीत कोरे,बालाजी पाटील संदीप पाटील,चेअरमन श्रीशैलेश ओवाडे सहकार्य करीत आहेत.

ऑनलाईन पीक विमा घेताना सर्व्हर डाऊन मुळे वारंवार अडचणी निर्माण होत आहे.दिवसभरात मोजकेच फार्म भरत आहेत त्यामुळे रांगेत थांबून शेतकऱ्याना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे मुदतीत पीक विमा भरून घेण्यासाठी राञी कामकाज सुरू ठेवले आहे.शक्य तितक्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन फार्म भरण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.यासाठी शेतकरीही साथ देत आहेत याचे समाधान वाटते,असे शाखा व्यवस्थापक व्हि. एस.चौधरी यांनी सांगीतले.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे शाखा व्यवस्थापक व्ही एस चौधरी हे जेवळी शाखेत सहा महिन्या पूर्वी आले आहेत.अल्प कालावधीत त्यानी येथील बॅक खातेदारा मध्ये बॅकेबद्दल पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहेत.त्यामुळे शेतकऱ्याचे अडचणी दूर करीत ऑनलाईन पीक विमा भरून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.यासाठी त्यांनी राञीचा  दिवस करीत असल्याचे दिसून येत आहे.त्याच्या अथक परिश्रमामुळेच शेतकर्याना ऑनलाईन पीक विमा भरणे शक्य होत आहे.त्याच्या या कामाबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. 


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post