गुजवाडा येथील पुलाची उंचीकरण , दुरुस्ती , पुलाला ग्रिल बसविण्यात यावी


अतुल नवघरे
लाखपुरी: भारिप बहुजन  महासंघ लाखपुरी सर्कल व गुंजवाडा व दापुरा येथील ग्रामस्थ व भारिप बहुजन महासंघ चे लाखपुरी सर्कल अध्यक्ष अतुल नवघरे  व  सम्यक विदयार्थी आंदोलन चे मूर्तीजापूर तालुका महासचिव संकेत कावरे  तसेच  उमेश तेलमोरे भारिप बहुजन महासंघ दापूरा शाखा अध्यक्ष व सुधीर समदुरे ,रोशन कोळसंकर व  दापूरा गावातील मित्र मंडळी गुजवाडा यांनी निवेदन दिले त्या निवेदनात नमुद आहे कि  गावातील पुलाची उंची अगदी कमी आहे व  पुलाला ग्रील नसून त्या पुलावर गड्डे पडल्या मुळे जीवित हानी होऊ शकते.तो रस्ता मूर्तीजापचर गुंजवाडा या गावातील मुख्य रहदारीचा  रस्त्याला एक पूल लागतो त्या पुलाची उंची अगदी ५ फूट उंची असून त्या  पुलाच्या कड्याला  ग्रील नसून त्या पुलाच्या वरती ६-७ फुटाचे गड्डे पडलेले आहेत आणि ही अशी परीस्थीती असल्या मुळे नागरिकांना  व विद्यार्थ्यांना गावातून जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यामुळे उमा नदी मध्ये भरपूर पानी जमा होते व नेहमीच पूर येतो व पाण्यामुळे पूल दिसत नाही त्यामुळे दि.१९ ला मा. उपविभागीय अभियंता मुर्तिजापुर , मा. उटविभागीय अधिकारी , मा. तहसिलदार साहेब , मा. गटविकास अधिकारी साहेब , मा. आमदार साहेब , मा. सर्व वुत्तपत्र संपादक यांना निवेदन देण्यात आले यावर शासन व लोकप्रतिनीधी काय करते याकडे लागले सर्वाचे लक्ष..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post