इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना सोयाबीन पिक वीमा त्वरित देण्यात यावा,यासाठी दि.13 जुलै रोजी कृषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षते खाली विधान भवन नागपुर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत येत्या आठ दिवसात कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे ठरले.यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुजितसिंह ठाकूर,उमरगा,लोहारा तालुका आ.
ज्ञानराज चौगुले,आ.राणाजगजितसिंह पाटील,आ. संगीताताई ठोंबरे,यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
