इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकरी महिलेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लोहारा यांच्याकडे तक्रार दिली होती.यावरुन लोहारा सहाय्यक निधंधकांच्या फिर्यादीवरुन लोहारा तालुक्यातील अचलेर येथील दोन सावकारावर मुरुम पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही सावकार फरार असुन मुरुम पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस ठाण्याकडुन मिळालेली माहीती अशी कि,लोहारा तालुक्यातील अचलेर येथील प्रमिलाबाई पाटील यांनी सन 2002 मध्ये बेपत्ता पतीचा शोध घेण्यासाठी गावातील मल्लीनाथ काशीनाथ पाटील यांच्याकडे 3 हेक्टर व भिमाशंकर इरण्णा पाटील यांच्याकडे 3 हेक्टर जमीन गहान ठेवुन 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते.यानंतर पुन्हा या महिलेने या दोघांकडुन 50 हजार रुपये व्याजाने घेतले.तसेच यापोटी पैसे परत केल्यानंतर जमीन परत देण्याच्या अटीवर त्यांनी जमीनीची खरेदीखत करुन दिले.
यानंतर प्रमिलाबाई पाटील यांनी पैशांची परतफेड करुन जमीन परत मागीतली.परंतु या दोघा सावकारांकडुन जमीन देण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रमिलाबाई पाटील यांनी दि.7 जुलै रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लोहारा यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली.यावरही कार्यवाही होत नसल्याने प्रमिलाबाई पाटील यांनी दि.4 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली.यावरुन जिल्हा उपनिबंधकांनी लोहारा येथील अधिकारी बी.एच.सावतर यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सावतर यांनी चौकशी अहवालात सदरील जमीनीवर प्रमिलाबाई पाटील यांचाच कब्जा असल्याचे नमुद करत गावातील लोकांच्या लेखी जवाबावरुन मल्लीनाथ पाटील व भिमाशंकर पाटील या दोघांचा सावकारीचा व्यवसाय असल्याचा अहवाल दिला.यावरुन लोहारा येथील सहाय्यक निबंधक व्यंकट नारायण विभुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुरुम पोलीस ठाण्यात मल्लीनाथ पाटील व भिमाशंकर पाटील यांच्याविरुध्द महाराष्ट्र सावकार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पो.नि.
मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार गोरखनाथ शिंदे हे करीत आहेत.
SHARE THIS