इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे व मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी दि.23 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील नदीपात्रात जलसमाधी घेतल्याबध्दल सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशा विविध मागणीसाठी लोहारा तालुका सकल मराठा ससमाजाच्यावतीने लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथील राष्ट्रीय महामार्गावर दि.27 जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करुन चक्का जाम करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य शासनाच्या व मुख्यमंत्र्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करुन ठीक ठीकाणी टायर जाळुन शासनाचा निषेध करण्यात आला.यावेळी अचानकपणे माकणी येथील युवक अजित कोरडे यांनी येथील चौपदरीकरण अर्धवट उड्डाण पुलावर अचानक चढुन आंदोलन केले.यामुळे कांही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु पोलीस प्रशासनानी व आंदोलन कर्त्यांनी या युवकाची समजुत काढुन खाली उतरावले.
यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने कै.काकासाहेब शिंदे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,कोपर्डी घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी,काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली आहे.तरी यास जबाबदार म्हणुन राज्य शासनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,ऐट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी,शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवण्यासाठी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागु करावी,आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे,अशा विविध मागण्या निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना देण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनामुळे आष्टामोड राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुने 15 कि.मि.अंतरापर्यंत वाहनाच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनात संजय जाधव,अच्युत साठे,प्रा.आनंदराव सुर्यवंशी,दिपक जवळगे,विठ्ठल साठे,दिनकरराव जावळे पाटील, दादासाहेब पाटील,प्रशांत काळे, नेताजी शिॆदे,विनोद मुसांडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी,बाळु सावकार,शाम पाटील, सुभाष बिराजदार,नितीन सुर्यवंशी,पांडुरंग बिराजदार,सचिन सुर्यवंशी,यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी अनुचित प्रकार घडु नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पो.नि. सर्जेराव भंडारे(लोहारा),सहाय्यक पो.नि. मुस्तफा शेख (मुरुम) यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

