राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते डॉ.हंगरगे दांपत्याचा सत्कार


 इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील नावाजलेले व समाजसेवेचा वसा घेतलेले गेली 20 वर्षां पासुन लोहारा तालुक्यात व परिसरात वैद्यकीय सेवा देत असताना,सामाजिक बांधिलकी जपत रूग्णाना आरोग्याच्या सेवा देण्याचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने केल्यामुळे डॉ.चंद्रशेखर हंगरगे यांचा गौरव सत्कार सोहळा लोहारा शहरातील बस्वेश्वर मंदिरात संपन्न झाला.यांची वैद्यकीय सेवेची 20 वर्षे पुर्ण झाल्याने लोहारा येथे राष्ट्रसंत प.पु.डॉ.श्री.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुर यांच्या हस्ते डॉ. चंद्रशेखर हंगरगे व पत्नी डॉ.सौ.संगिता हंगरगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षण महर्षी माजी आ.आलुरे गुरुजी,माजी समन्वय तालुका अध्यक्ष नागण्णा वकील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकरअण्णा जटटे,माजी पं.स.सदस्य
चंद्रकांत पाटील,कॉग्रेस शहराध्यक्ष हरि लोखंडे, नगरसेवक बाळासाहेब कोरे,शिवा स्वामी,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,माधव वकिल,महेश कुंभार,सचिन तोडकरी,प्रकाश तोडकरी,गणेश कमलापुरे,विशाल मिटकरी,प्रसाद मिटकरी,योगेश मिटकरी,नितिन तोडकरी,यांच्यासह समाज बांधव व महिला व विध्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post