वाकडी ता.जामनेर येथे दोन दलित मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ लोहारा शहर लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्यावतीने कडकडीत बंद


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- वाकडी (ता. जामनेर जि. जळगाव) येथील दोन दलित मुलांना नग्न करून केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ 20 जुन रोजी मातंग समाजाच्या वतीवने लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
      वाकडी येथे विहिरीत पोहल्याच्या कारणावरून मातंग समाजाच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करून नग्न धिंड काढण्यात आली.या घटनेचा लोहारा शहरातील विविध संघटनानी तिव्र निषेध व्यक्त केला आहे.तर लहुजी शक्ती सेनेने लोहारा शहर बंदची हाक दिली होती.त्यानुसार बुधवारी कडकडीत बंद  पाळण्यात आला.या शहर बंदला व्यापाऱ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राज्यात दिवसेंदिवस दलितावरील अत्याच्यारांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दलितांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर उपायोजना करव्यात.वाकडी येथील केलेले कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे. अशा विकृत कृत्य करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे,अशी मागणी तहसीलदार यांना  दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी लहुजी सेनेचे युवा नेते दीपक प्रकाश रोडगे,रवि पवार,मारूती रोडगे, बलाजी कसबे,अभिजीत सगट,श्याम रोडगे, श्रीपती सुरवसे,अक्षय रोडगे,सुशिल रोडगे,संदीप रोडगे,लखन रोडगे,शिवराज कांबळे,बंडू वाघमारे, अमोल रोडगे,बाळू वाघमारे,लक्ष्मण सगट यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी लोहारा शहरात पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post