पूर्णा /प्रतिनिधी: {राजेश वालकर}तालुक्यातील धनगर टाकळी गावात ध.टाकळी ते सारंगी रोडवर उभ्या असलेल्या एका ३५ वर्षिय तरुणाला नांगरणीचे ट्रॅक्टर का अडवले म्हणून सोमवारी १८रोजी सायंकाळी मारहाण केल्याची घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, धनगर टाकळी हुन कडे जाणा-या रस्त्याजवळ फिर्यादी सारंगी रोडवरील हापस्या जवळ गावातील फिर्यादी सोपान किसनराव आढाव यास आरोपी हरिभाऊ शेषेराव आढाव याने तू माझे नांगरणीने ट्रॅक्टर का अडविले म्हणत त्याला शिवीगाळ करू लागला.हातात असलेल्या कोयत्याच्या दांड्याने सोपान आढाव यांच्या डाव्या कानाजवळ मारुन गंभीर जखमी केले.
या प्रकरणी सोपान माणीकराव आढाव यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात गुरनं४९/१८ नुसार ३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून या प्रकरणी पुढील तपास जमादार सुजलोड पोकलवार हे करित आहेत.
