इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उस्मानाबाद जिल्हयाचे सहकार 'रत्न' सत्कारमुर्ती औशाचे आ.बसवराजजी पाटील यांनी उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त केल्याबध्दल यांचा
उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथिल सभागयहात तुळजापुरचे आ.मधुकररावजी चव्हाण यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,प्रशांतजी चेडे,विश्वास अप्पा शिंदे,ब्रिजलाल मोदाणी,बाळासाहेब शिंदे लक्ष्मण सरडे,राजभाऊ शेरखाने,सिध्दार्थ भागवत,धस बनसोडे,उमेश राजेनिंबाळकर,नारायण समुद्रे,मुजीब पठाण,धनंजय राऊत,राजभाऊ नळेगावकर,बालाजी माने,अदि उपस्थिती होते.
या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
