इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात अनेक दिवसांपासून होत असलेल्या विविधांगी स्थानिक प्रश्न त्यात प्रामुख्याने वीज, आरोग्य, पोलीस गस्त वाढवावे तसेच पावसाळा सुरू झाल्याने गटारी तुंबण्यामुळे वाढत असलेले घाणीचे साम्राज्य, नगरपरिषद अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधिकारी कार्यालयीन वेळेत सतत गैरहजर राहणे, शहरवासीयांच्या प्रश्नांकडे नजरंदाज करणे, रुग्णालयात प्रचंड प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णालयातील परिचारिक व परीचारिकांच्या गैरवर्तुणुकीमूळे रुग्नांना होणारा जाच तसेच प्रसूती विभागात पुरेशी सुविधा व स्वच्छता नसल्याने महिला रुग्णांना मानसिक त्रास होणे व
अँबुलन्सकरिता (रुग्णवाहिका) कायमस्वरूपी एक चालक व एक डॉक्टर सतत असावे या विविध समस्येच्या अनुषंगाने मुरूम शहरातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासन, वीज अभियंता, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यासर्व कार्यालयीन ठिकाणी जाऊन उपस्थित जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, लिंगायत सेवा संघाचे देवराज संगुळगे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मोहन जाधव, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष भगत माळी, टिपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष बाबा कुरेशी, सरकार भिमराज ग्रुपचे शहराध्यक्ष सूरज कांबळे, मराठा सेवा संघाचे दत्ता जाधव, बाळू मुळे, अनिकेत गायकवाड यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.