इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात औशाचे आ.बस्वराज पाटील परिवार व युवक काँग्रेसच्या वतीने दि.12 जुन रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी प्रमुख म्हणुन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील,उमरगा पंचायत समितीचे सभापती मदन पाटील,विकासेसोचे व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी,उमरगाचे नगरसेवक महेश माशाळकर, विजय वाघमारे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव,माजी नगराध्यक्ष प्रा.सुधीर अंबर,शिवाजी चेंडके,बबनराव बनसोडे,रशीद गुत्तेदार, कंटेकूरचे सरपंच गोविंद पाटील,प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक मिणीयार, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन डागा,नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे,इब्राहिम नदाफ,सलीम अत्तार,अदि उपस्थिती होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे गौस गुत्तेदार,शहर काँग्रेस सुधीर चव्हाण, राजु मुल्ला,चाँदपाशा मुल्ला,बाबा शिकलगर,सुरेश शेळके आदींनी पुढाकार घेतला.
