लहुजी शक्ती सेना लोहारा यांच्या वतीने दहावीच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात तालुका लहुजी शक्ती सेनेच्यावतीने दहाविच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील मोघा बु येथील प्रणिता बालाजी सुर्यवंशी या विद्यार्थीनीने 99.20% तर अजिंक्य भागवत साळुंके याने 95.20% गुण मिळवुन तालुक्याचे नाव लौकिक केले.या विद्यार्थ्यांचा लहुजी शक्ती सेना सामाजिक संघटना यांच्या वतीने सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी लहुजी शक्ती सेना लोहारा शहर अध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे,उपाध्यक्ष अक्षय उमाकांत सगट, शाम रोडगे,विवेकानंद स्वामी,कोचिंग क्लासेस शिक्षक  सहदेव काडगावे,मल्लिकार्जून कलशेट्टी,प्रकाश  तोडकरी,मनोज बादुले,महेश पाटील,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post