इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाउंडेशन, उस्मानाबाद व चाईल्डलाईन, उस्मानाबाद यांच्या वतीने भाई उद्धवराव पाटील प्रशाला, उस्मानाबाद* च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना 1098 या टोल फ्री नंबरची जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
समाजातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील आजारी, एकटे,मारहाण होत असणारे,बेवारस किंवा हरवलेले, बालकामगार बालगुन्हेगार,छळ होत असणारे तसेच सांभाळ व सुरक्षिततेची गरज असणाऱ्या मुलांसाठी चाईल्ड लाईन उस्मानाबाद रात्रं-दिवस मदतीसाठी हेल्पलाईन आहे.चाईल्डलाईन चे काम व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.यासाठी भाई उद्धवराव पाटील प्रशाला,उस्मानाबाद येथे सह्याद्री फाउंडेशन्स व चाईल्ड लाईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज यांनी प्रशालेत मार्गदर्शन करुन माहीती पत्रक वाटली व चाईल्ड-लाईन बद्दल सविसितर माहिती दिली.
या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक ए.ए.ठाकूर यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका एस.ए.नलावडे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक गजानन पाटील,नाना शिंदे,सहशिक्षक के.व्हि.शेख,श्रीमती सी.एस.शिंदे,पी.के.गाढवे,व्ही.सी.नायगावकर,एच.व्ही.वाघमारे,एम. बी.देशमुख,एन.के.भाटे,ए.ए.घोगरे,पी.एल.माळी,एच. व्ही.घेवारे,पी.जी.देशमुख,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
