पूर्णा : प्रतिनिधी-येथील श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालयात 31वर्षा पासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत. ते आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी बाली येथील (इंडोनेशिया ) उदमाणा विद्यापीठात आपला संशोधनपर पेपर स्टेटस आॅफ लायब्ररी अॅनिमेशन विथ स्पेशल रेफरन्स टू अॅग्रोकल्चर काॅलेज लायब्ररी या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
डाॅ. रामेश्वर पवार हे राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष असून त्यांचे 11 पुस्तक व 80 लेख प्रकाशित आहेत. त्यांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय,विभाग व जिल्हास्तरीय 22 अधिवेशन / कार्यशाळाचे आयोजन केले आहे. त्यांना शासनाचे व संस्थेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, सिताराम आप्पा एकलारे, उत्तमराव कदम, भुजंगराव कदम, साहेबराव कदम, प्रा. गोविंद कदम, प्राचार्य मनोहर सोनटक्के, प्राचार्य के. राजकुमार व अरूण डुब्बेवार आदींनी अभिनंदन केले आहे
