आईचा छळ करणाऱ्या मुलाला घरात प्रवेश नाही- मुंबई हायकोर्ट.


मुंबई :- ७२ वर्षीय आईला दररोज मारझोड आणि तिचा मानसिक छळ करणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. आईला त्रास देणारा मुलगा घरावर हक्क गाजवू शकत नाही.

 तसेच घरात प्रवेश करण्याचा अशा मुलाला कोणताही अधिकार नाही अशा शब्दांत न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी कानउघाडणी करत सदर मुलाला चांगलेच फटकारले. एवढेच नव्हे तर संबंधित मुलाला कायमचे घर सोडून जाण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले.
जाहिरात

दक्षिण मुंबईतील एका रहिवाशाने आपल्या आईच्या घरात प्रवेश मिळावा तसेच त्या ठिकाणी राहता यावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर आज त्याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. पत्नी व मुलासमवेत आपण घराबाहेर गेलो असता आईने घराचे कुलूप बदलले व घराबाहेर हाकलून दिले असा आरोपही त्या मुलाने केला.

जाहिरात
तसेच आपणास आईने मालमत्तेतूनही बेदखल केल्याचे त्याने खंडपीठाला सांगितले. त्यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या वृद्ध महिलेने कोर्टाला सांगितले की दक्षिण मुंबईतील ही मालमत्ता आपल्या मयत पतीची व आपली असून त्या मालमेत्तेवर इतर कोणाचाही अधिकार नाही.
जाहिरात

मुलाकडून तसेच सुनेकडून अत्याचार होत असल्यामुळे आपल्या बचावाकरिता घराचे कुलूप बदलले असल्याचेही या वृद्ध महिलेने न्यायमूर्तींना सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत त्यावर न्यायमूर्ती काथावाला यांनी चांगलेच खडसावले. तसेच आईच्या मालकीच्या घरातून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले.

पोलीस संरक्षण द्या!

मुलाच्या व सुनेच्या जाचापासून आपले संरक्षण व्हावे याकरिता पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी संबंधित महिलेने न्यायमूर्तींकडे केली होती. त्यावेळी न्यायमूर्तींनी मलबार हिल पोलिसांना त्या महिलेला संरक्षण देण्याचे आदेश दिले. तसेच या वृद्धेला सर्वतोपरी मदत पुरवा, असेही न्यायमूर्तींनी पोलिसांना बजावले. जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post