- नविन नियुक्त्या लवकरच घोषीत करणार
प्रतिनिधी यवतमाळ :- युवासेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख गजानन बेजंकीवार यांचे पद युवासेना विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी बरखास्त केले आहे.यवतमाळ येथे नविन जिल्हाप्रमुख पदाच्या मुलाखती घेण्यासाठी आल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
यवतमाळ जिल्हयात युवासेनेचे जिल्हाप्रमुख पद गजानन बेजंकीवार यांना देण्यात आले होते. काही वर्ष ते या पदावर कार्यरत होते. आता मात्र पक्षातंर्गत
नविन नियुक्त्या करणे सुरु झाले आहे. त्याअनुषंगाने अभिमन्यू खोतकर हे नुकतेच यवतमाळ जिल्हयाच्या दौ-यावर येऊन गेले. यवतमाळ येथील विश्रामगृहावर
त्यांनी जिल्हयातील युवकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर यवतमाळातील गजानन बेजंकीवार यांचे जिल्हाप्रमुख पद बरखास्त करीत असल्याचे घोषीत केले.
यवतमाळात आता नविन जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उप शहर प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हयातील जवळपास दोनशे युवकांनी
या पदांसाठी मुलाखती दिल्या. नविन नियुक्ती बाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. पक्ष वाढीसाठी विशेष परीश्रम घेणा-या तरुणांना प्रामुख्याने पदांवर नियुक्ती दिली जाणार असल्याचे अभिमन्यू खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.
