![]() |
| पक्षांसाठी पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ करतांना खासदार भावनाताई गवळी |
- भावनाताई गवळी यांनी केला शुभारंभ, 100 ठीकाणावर राबविणार
मक़सूद अली
प्रतिनिधी यवतमाळ :- पाऊस कमी पडल्याने शहरात पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान नागरीकांची पाण्यासाठी पायपीट होत असून पक्षांना सुध्दा
उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नेमकी हीच बाब हेरुन यवतमाळच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षांसाठी पाणपोई हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाची सुरुवात खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते करण्यात आली.
सध्या पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्याने शिवसेनेच्या वतीने 28 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. दुसरीकडे आता युवासेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख अमोल धोपेकर यांच्या संकल्पनेतून पक्षांसाठी पाणपोई सुरु करुन युवासेनेने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
खासदार भावनाताई गवळी यांच्या घरी झाडावर ही पाणपोई लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.मातीचे विशिष्ट आकाराचे भांडे तयार करुन घेण्यात आले असून शहरातील बगीचे, शासकीय कार्यालये यासह विविध ठिकाणी या पाणपोई लावण्यात
येणार आहे. नागरीकांना अशा पाणपोई लावायच्या असलयास त्यांनी युवासेने सोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे युवासेनेचे कार्यकर्ते रोज या मातीच्या मडक्यामध्ये पाणी टाकणार आहे. पर्यावरण संतुलनासाठी असे उपक्रम सातत्याने घेण्याचे आवाहन या प्रसंगी भावनाताई गवळी यांनी केले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, निवासी उप जिल्हाप्रमुख प्रविण पांडे,
गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, प्रसाद अवसरे, सचिन चव्हाण इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
