![]() |
* बँक अधिकाऱ्यांना दिली सूचना
* शुक्रवार हा शेतकरी कर्ज साहयता दिन
* तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी शुक्रवारी बँक शाखेत हजर राहावे
* बँकेत हेल्पडेस्कची निर्मिती करावी
जाहिरात
एकही जण यापासून वंचित राहू नये, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना केली. तसेच शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज साहयता दिन’ मानून तलाठी, कृषीसहायक, ग्रामसेवकांनी बँकांच्या शाखेत उपस्थित राहून कर्ज घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीचे निराकरण करुन त्यांना कर्ज मिळण्यासाठी साहय करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.
![]() |
जाहिरात
पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा मोठा हंगाम असतो. या हंगामात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्याची गरज भासते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना बँकांकडून तातडीने पिक कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे. त्याकरीता बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जलदगतीने कार्यवाही करावी.
![]() |
बँकेच्या दर्शनी भागात ‘अर्ज दया, कर्ज घ्या, पिककर्जाबाबत शेतकऱ्यांना अडचण आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा’ अशा मजकुराचे फलक लावाण्यबरोबरच पिककर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सूचनाही लावावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बँक शाखेत हेल्प डेस्कची निर्मिती करुन त्या ठिकाणी कर्जाची माहिती असणाऱ्या होतकरु युवकांची नेमणूक करावी.
तहसिलदार यांनी पिककर्ज वाटपाबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. दिलेले उदिष्ट वेळेत पूर्ण करण्याबाबत बँकांनी सजग राहावे. यावेळी धडक सिंचन विहिरी व नरेगातील विहिरींच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. ज्या विहिरी पूर्ण झाल्या आहेत, त्यांचे पैसे तातडीने अदा करावेत.
जाहिरात
अपूर्ण विहिरी आहेत, त्याबाबत लाभार्थ्यांकडून संमतीपत्र घेऊन विहिरी रदद करुन त्यांचा लक्ष्यांक समितीमार्फत इतरांना वळता करावा. मजुरांचे मस्टर अदयावत करावे. याबाबतचा आढावा पुढील आठवडयात घेतला जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. पालकमंत्री शेत/पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, पावसाळयापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत.
तसेच पक्के रस्ते तयार करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव तातडीने उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रकासाठी पाठवावा. पुढील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करुन रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हयातील पाणीटंचाईचा आढावा घेताना सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातील टंचाई परिस्थितीवर विशेष लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. नगर पालिकांनी शहरी भागात पाण्याची टंचाई भासू देवू नये. मागणीप्रमाणे टँकर तातडीने उपलब्ध करुन दयावेत.
दरम्यान अकोल्याचे तहसिलदार राजेश्वर हांडे यांना पदोन्नती मिळाल्याबददल त्यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.


