प्रणव मुखर्जी लावणार संघाच्या कार्यक्रमाला हजेरी

जाहिरात


नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जून महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. एकेकाळी काँग्रेसच्या ताफ्यातील दिग्गज नेत्यांमध्ये प्रणव मुखर्जींचा समावेश होत असल्याने राजकीय वर्तुळात यासंदर्भात जोरदार चर्चा रंगत आहे.  
जाहिरात

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला १४ मे पासून नागपूरात सुरुवात झाली. देशभरातून जवळपास ८०० तरुण स्वंयसेवक प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले आहेत. रेशीमबाग मैदानावर ७ जूनला प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाची सांगता हाणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला असून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा संघ अथवा मुखर्जी यांच्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमात  प्रणव मुखर्जी हजेरी लावणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post