गागालगाल गागा गागालगाल गागा
गागालगाल गागा गागालगाल गागा
सारा समाज येथे जातीत वाटलेला
माणूस मरत जगतो आतून फाटलेला
माणूस मरत जगतो आतून फाटलेला
झाला निसर्ग लहरी त्याला प्रमाण नाही
नाहीच काळ कुठला शिस्तीत मांडलेला
नाहीच काळ कुठला शिस्तीत मांडलेला
इतिहास आज कोणी सांगू नका चुकीचा
शोधू जुना जमाना मातीत गाढलेला
शोधू जुना जमाना मातीत गाढलेला
बगळे लबाड होते साधू तसेच ढोंगी
आहेच स्वार्थ त्यांच्या अंगात साठलेला
आहेच स्वार्थ त्यांच्या अंगात साठलेला
गझले तुझ्या यशाचे गावू किती पवाडे
उत्साह तू दिला मज माझ्यात रंगलेला
उत्साह तू दिला मज माझ्यात रंगलेला
जपतो परंपराना तो भाग्यवंत आहे
संसार बघ सुखाचा करतोय मांडलेला
संसार बघ सुखाचा करतोय मांडलेला
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७