जाहिरात
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरस्वती देवस्थान कमिटीच्यावतीने सरस्वती मंदिरात तिन वर्षात येणाऱ्या अधिक मासानिमित्त दि.25 मे पासून विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह व परमरस्य ग्रंथाच्या पारायणास सुरुवात झाली आहे.या शिवनाम सप्ताहचा सांगता दि.31 मे रोजी काल्याच्या किर्तनानी होणार आहे.या सात दिवसाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या काळात येथील सरस्वती मंदिरात दरोज पाहाटे पाच ते सहा शिवपाठ,सकाळी सात ते आठ सरस्वतीच्या मूर्तिला महाभिषेक,आठ ते बारा श्री परमरस्य ग्रंथाचे पारायण,दुपारी दोन ते चार गाथाभजन,सायंकाळी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा नामजप, सहा ते सात शिवपाठ,सात ते रात्री नऊ भोजन, नऊ ते बारा शिवकिर्तन तर एक ते पहाटे चार शिवजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
जाहिरात
या शिवनाम सप्ताहत दरोज सायंकाळी चार ते पाच प्रवचन तर रात्री नऊ ते बारा शिवकिर्तन पार पडत आहे.यात दि.25 मे रोजी प्रवचन रामचंद्र ढोबळे गुरुजी (जेवळी) तर किर्तन- सौ शिलाताई मालोद (तोंडार),दि.26 मे रोजी प्रवचन- अण्णाराव बिराजदार महराज (हिप्परगा सय्यद), किर्तन- उध्दव हैबतपुरे महाराज (उदगीर),दि.27 मे रोजी प्रवचन- काका महाराज (भुयार चिंचोली), किर्तन- सौ भाग्यश्री पाटील (दौड हिप्परगा),दि.28 मे रोजी प्रवचन- बसवराज म्हेत्रे गुरुजी (उडगी) किर्तन- सोपान सोनटक्के महाराज (परभणी),दि.29 मे रोजी प्रवचन- उज्वलाताई कुलकर्णी (जेवळी), किर्तन- कु. किर्तीताई सालगरे-स्वामी (उदगीर),दि.30 मे रोजी आर.व्ही. पाटील,दि.31 मे रोजी (तडोळा) किर्तन- संगिताताई मस्कले (मुखेड), बाबुराव भुजबळ (वाडी वडगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या शिवनाम सप्ताहाचे सांगता होणार आहे.
या काळात पार पडणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
