![]() |
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आमचा भाषणचा उद्देश हा फक्त इतिहास सांगणे हा नसतो.इतिहासातुन वर्तमानाची प्रेरणा घेऊन भविष्य काळ आपला कसा असतो हा असुन जुलमी राजवट संपविण्याकरीता शिव शंभोच्या वारसदारांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी यांनी केले.
लोहारा शहरातील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी बब्रुवान पाटील हे होते.यावेळी प्रमुख म्हणुन पुणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यु पवार,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धस, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागाण्णा वकील,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे,एबीव्हीपीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्यध्यक्ष वंदना भगत, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, पो.नि.सर्जेराव भंडारे,लोहारा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक जाधव,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे,मोहण जाधव,आदी उपस्थित होते.पुढे बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घेऊन जी माणसे सध्या सत्तेमध्ये आली त्यांनी जे आराजकतेचे वातावरण निर्माण केले आहेत.
![]() |
जे की भिमा कोरेगावची दंगल, औरंगाबादची दंगल,राज्य मागास्वर्गिय आयोगामध्ये महादेवराव लिंगेवर,सुषमा अंधारे यांच्यावर झालेला हल्ला, सत्यशोधम समितीच्या अहवालामध्ये ब्राम्हण महासंघाने उमर खालीद,जिग्नेश मेवानीसह आमची ही नावे घेतली भिमा कोरेगावच्या दंगलीत आणि एकबोटे,भिडे याना मात्र सरकारने क्लिन चिट दिली. हे जे काय आराजकतेचे वातावरण आहे.
हे कुठल्या ही परीस्थितीमध्ये संपले पाहीजे.असे सांगुन अमोल मिटकरी पुढे म्हणाले की,पण सत्ता हातात घेऊन जाती - जातीमध्ये फुट पाडणारी जी प्रवृत्ती आहे. ती नष्ट करण्यासाठी धडसाने पुढे येणे काळाची गरज असल्याचे ही सांगितले.याप्रसंगी सुनंदाताई माने, रेखाताई सुर्यवंशी,अॅड. दादासाहेब पाटील,प्रकाश भगत,दीपक गोरे,गोविंद सोबाजी,संजय जाधव, दादा पाटिल, शैलेश चंदनशिवे, सहदेव गोरे, नाना पाटिल, दिपक गोरे, रंजनाताई हासुरे,दिपक जाधव,गिरीष भगत,विशाल गोरे,श्रीहरी रसाळ,गोपाळ माने,योगेश बिराजदार,सुशिल साळुंके,कृष्णांत आण्णा साठे, गोविंद देशमुख,प्रविण मुगळे,विठ्ठल सुर्यवंशी,शुभम पाटिल,सुरज भोरे,लक्ष्मण बिराजदार,किरण चिंचोले, प्रविण मुगळे,मंगेश मोरे,धनराज बिराजदार,मनोज देशपांडे,सुरज साळुंके,रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी पुणे येथील बीजेएसचे प्रशासक सुरेश साळुंके,उमरगा येथील कृषी अधिकारी सारिकाताई अ.अंबुरे,सामाज सुधारक शिवाजीअप्पा कदम,पुणे येथील यशस्वी ऊद्योजक दत्तात्रय राठोडे,बेंगलोर येथील युवा उद्योजक आप्पासाहेब कदम यांना मराठा भुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
![]() |
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्यसन मुक्ती प्रदेशध्यक्ष डॉ.संदीप ताबारे व सुत्रसंचालन संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके व मोहण जाधव यांनी केले तर अभार अभिमान्यु पवार यांनी मानले.या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


