- नवरदेवासह वडिलांवर हुंडाबंदी कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल
रफीक कनोजे
झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी (भेंडाळा) येथील सुधाकर ठाकरे यांनी वराकडील मंडळीला हुंडा न दिल्याने लग्नाच्या दिवशी नवरदेवान लग्न मंडपाला दांडी मारली ज्यामुळे सुधाकर यांची समाजात मोठी बदनामी झाली असून याबाबत पोलीस स्टेशन ला तक्रार दिली आहे. पोलिसांनी नवरदेव व नवरदेवाच्या वडीला विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सावळी येथील सुधाकर ठाकरे हल्ली हैद्राबाद येथे आपल्या कुटुंबासह राहतात. दोन महिन्यांपूर्वी आपल्या मुलीला लहान भावाकडे सावळी (भेंडाळा) येथे पाहणी करिता पाठविले होते.यातच चिंदू जांनबा राऊत व मुलगा राकेश चिंदू राऊत राहणार सावंगी बेला तालुका उमरेड जिल्हा नागपूर व मध्यस्थी हे मिळून मुलगी पाहण्याकरिता आले व मुलगी पसंद पडली आणि ६ फेब्रुवारी ला साक्षगंध चा कार्यक्रम सावळी येथेच पार पडला. व १५ दिवसांनी मुलीला लग्नाचे कपडे , दागिने घेण्याकरिता ९० हजार रुपये हिंगणघाट येथे माध्यस्तीच्या समोर देण्यात आले.व तेंव्हाच लग्नाची तारीखही २ मे काढण्यात आली.लग्नाची तारीख पक्की होताच मुलीच्या वडिलांनी पत्रिका छापून सर्व नातेवाईका पासून तर मित्र मंडळी पर्यंत लोकांना वाटले. लग्नाचा दिवस येताच संपूर्ण तयारी मंडप डेकोरेशन , ५०० लोकांचे जेवण व इतर सर्व तयारी झाली.परंतु २७ एप्रिल म्हणजे लग्नाच्या पाच दिवसापूर्वी अक्षदा बनविण्या करिता मुलीचे वडील व त्यांचा लहान भाऊ नवरदेवाच्या घरी गेले असता मुलगा व वडिलांनी एक लाख रुपयांची हुंडी मागितली. एवढी हुंडी मी देऊ शकत नाही माझी ऐपत नाही असे म्हणताच मुलाच्या वडिलांनी व मुलाने तुम्ही एक लाख रुपये न दिल्यास आम्ही लग्नाला येणार नाही असा दम दिला. व मुलीचे वडील परत गावी आले. लग्नाच्या दिवशी सकाळी मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडीलाला फोन करून विचारले किती वाजेपर्यंत येता मुलाच्या वडिलांनी माझा मुलगा फरार झाला आम्ही येऊ शकत नाही असे म्हणताच मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच निघुण गेली व काय करावे सुचत नव्हते कारण सर्व पाहुणे नातेवाईक, मित्रमंडळी , मंडपात येऊन ठेपली होती ५०० लोकांचे जेवण या सर्व चिंतेने मुलीचे वडीलाला शॉक लागला.व आपली मोठी फसवणूक झाली असे समजून मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून मुलगा व वडीलविरुद्ध तक्रार दिली व आमची फसवणूक करून ३ लाख ५० हजाराचे नुकसान केल्याचे म्हटले आहे यावरून पोलिसांनी मुलगा राकेश राऊत वडील चिंधुजी राऊत यांच्या विरुद्ध हुंडा मागणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार गुलाब वाघ यांच्या मार्गदर्शना खाली पीएसआय नितीन चुलपार करीत आहे.
