![]() |
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शिवाजी चौकात बसवेश्वर जंयती उत्सव समितीच्यावतीने दि.18 एफ्रिल रोजी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन कृ.उ.बाजार समितीचे संचालक शंकरअण्णा जट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.व तसेच ध्वजारोहन तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष मंगेश बनशेट्टी,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक श्रीनिवास माळी,कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील नगरसेवक शाम नारायणकर,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,शिवा स्वामी,पत्रकार निळकंठ कांबळे,गिरीश भगत, बाळासाहेब पाटील, वैजिनाथ पाटील,गणेश पालके,महेश कुंभार,रामेश्वर मिटकरी,बाळु माशाळकर,युवक सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,संतोष फावडे,ओम पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,शिवानंद माशाशकर,वैजिनाथ माणिकशेट्टी,संगण्णा स्वामी,रौफ बागवान यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.