जि प प्रा उर्दू शाळा कुरुम येथे वाटर फिल्टर मशीन चा उद्घाटन शाळा समिति अध्यक्ष हाजी मो नासिर भाई हस्ते उद्घाटन करण्यात आले.


शफी खान 
कुरम :- आज दि. 2/4/2018 ला जि. प. व. प्राथमिक केंद्रिय उर्दू शाळा कुरुम येथे वाटर फिल्टर चा लोकार्पण सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. नासीर भाई, उपाध्यक्ष श्री. इम्रान खान तसेच कुरुम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रविण रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री आबेदिन सर यांनी आपल्या प्रास्ताविकेत लोकवर्गणीतून घेण्यात आलेल्या वाटर फिल्टर चे महत्त्व विद्यार्थी समोर व्यक्त केले व याचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांनी कसा करावा ते सांगितले.


तर केंद्रप्रमुख श्री प्रविण रोकडे सर यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व विशद केले व विद्यार्थी आजपासून पाण्याचा जपून वापर करतील अशी शपथ घेतली. नंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नासीर भाई व प्रमुख अतिथी यांचे हस्ते रितसर रिबन कापुन वाटर फिल्टर कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सदर वाटर फिल्टर शाळेला उपलब्ध करून देण्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नासीर भाई यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांची मेहनत तसेच उपाध्यक्ष इम्रान खान व ईतर समिती सदस्य यांच्या अथक प्रयासाने व दुरद्रुष्टीपणामुळे उन्हाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असे मनोगत शाळेचे पदविधर शिक्षक श्री. शब्बर अली सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शब्बर अली सर पदविधर शिक्षक कुरुम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सैय्यद महमुद सर स. अ. कुरुम ऊर्दू यांनी केले.सदर वाटर फिल्टर करीता निधी उपलब्ध करण्यात श्री. अय्याज सर, श्री. अनिस सर व ईतर सर्व शिक्षक जि. प. शाळा कुरुम ऊर्दू यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post