उमेश खोसे यांच्या बोली भाषा व तंत्रज्ञान या नवोपक्रमास मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार



चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने आयोजित " राज्यस्तरीय नवोपक्रम " स्पर्धेत उमरगा तालुक्यतील बेळंब तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांच्या बोली भाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाला राज्य पुरस्कार मिळाला आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे येथे  संचालक श्री. सुनीलजी मगर साहेब, उपसंचालक विकास गरड, नामदेव शेंडकर, शोभा खंदारे, नेहा बेलसरे यांच्या हस्ते उमेश खोसे यांचा सन्मान झाला आहे.
     उमेश खोसे हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. तंत्रज्ञानात त्यांचं कार्य अतुलनीय आहे. त्यांनी राज्य तंत्रस्नेही म्हणून वेगवेगळे संमेलन घेतली आहेत. तसेच त्यांच्या बंजारा बोली भाषेतून इयत्ता 1 लीच्या पाठयपुस्तक राज्य स्तरावर गाजले असून याचा फायदा तांड्यावर काम करणाऱ्या गुरुजींना होत आहे.
      त्यांनी मुलांना 100% शाळेत यावीत, टीकावीत व शिकवीत यासाठी त्यांनी बोली भाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची अमलबजावणी केली व ती यशस्वीही झाली. सध्या शाळा 6 वी पर्यंत वर्गवाढ झालेली आहे. तसेच शाळेत शिक्षक संख्या 3 वरून 5 झाले आहेत. गतवर्षी इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 12 पैकी 6 विध्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. 
      शाळेत उमेश खोसे व शिक्षकांनी बनविलेल्या इयत्ता 1 लीच्या बंजारा बोली भाषेतील पुस्तकाचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी केले आहे. तसेच या पुस्तकाचं अनावरण प्रधान शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या हस्ते झालेले आहे.


     यावर्षी झालेल्या लातूर, अमरावती,रत्नागिरी व नाशिक याठिकाणी झालेल्या शिक्षणाच्या वारीत खोसेच्या बोली भाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड झालेली होती व संपूर्ण महाराष्ट्रात याच सादरीकरणही झालेले आहे. 
    त्यांच्या या नवोक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्याचे डायटचे प्राचार्य कलिमजी शेख साहेब, शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप साहेब, गटशिक्षणाधिकारी दशरथ यरवळकर साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post