चेतन पवार
उमरगा/प्रतिनिधी :-आज दि. 26 मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हास्तरीय शिक्षिका साहित्य संमेलन शांताई मंगल कार्यालय उमरगा येथे रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी लातूर पंचायत समातीच्या आदरणीय गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांची पहिल्या जिल्हास्तरिय शिक्षिका साहित्य संमेलन अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तृप्ती अंधारे मॅडम या प्रसिध्द साहित्यिक असून उपक्रमशील अधिकारी आहेत. त्यांनी महिला व मुलींसाठी विशेषकरून कार्य चालू आहे. कन्या सुरक्षा कवच असेल, कॉफी विथ क्रीयेटर असेल असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी एक वेगळाच ठसा राज्य स्तरावर उमटविला आहे. त्यांना मानव संसाधन मंत्रालायमार्फत राष्ट्रीय उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी पुरस्कार तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते मिळाला आहे.
साहित्य संमेलनाला जिल्ह्यातही सर्व शिक्षक बंधू भगिनी व साहित्य रसिकानी उपस्थित राहावे असे आवाहन
शिक्षिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सरिता उपासे, बबिता महानूर, कोरे सारिका, जावळे शीतल, उषाताई गाडे, सुवर्ण जगताप, संगीता डोकडे
यांनी केले आहे.
