बार्टी तर्फे पंचायत समिती लोहारा येथे सावित्रीबाई फुले स्मृतीदिन साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा :-  लोहारा पं.स.च्या सभागृहात बार्टी यांच्यावतीने 10 मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 121 व्या स्मृतिदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बार्टीचे समतादूत नागेश फुलसुंदर यांनी सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य,त्यांनी केलेले परिश्रम,मुलींची पहिली शाळा,पहिल्या मुख्याध्यापीका अनंत अडचणींवर मात करून मुलींना दिलेलं शिक्षण आदी विषयावर सखोल असे प्रबोधन केले. तर समतादूत किरण चिंचोले यांनी सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण इतिहास वर्तवला.तसेच व्यसनाधीनता,सतीची प्रथा,शेतकऱ्याचा आसूड याविषयी मार्गदर्शन केले.
  यावेळी जिल्हा परिषद उस्मानाबाद चे जिल्हा मॅनेजर अशोक गवळी,हार्डवेयर इंजिनीअर अशोक सोमवंशी, लोहारा तालुका व्यवस्थापक बाळू शिंदे आदींचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला पंचायत समिती चे पदाधिकारी,कारकून, संगणक परिचालक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन कृष्णा गोरे यांनी केले, तर आभार गणेश डोंगरे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post