सरपंचाच्या अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर असतो. सरपंच हा ग्रामविकासाचा महत्वाचा घट आहे



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सरपंचाच्या अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर असतो. सरपंच हा ग्रामविकासाचा महत्वाचा घट आहे,असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
        लोहारा तालुक्यातील फणेपूर येथे दि.26 मार्च रोजी येथील सरपंच मुक्ताबाई भोजणे यांनी तालुका सरपंच संघटनेच्या निवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख म्हणुन शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,लोहरा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पौर्णिमा जगदिश लांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे,राजेंद्र माळी, पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे,शिवसेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी,अदि उपस्थित होते. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले पुढे बोलताना म्हणाले की,सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे ग्रामपंचायतीना पर्यायाने सरपंचाना विशेष अधिकार बहाल करण्यात आली आहेत.या अधिकाराचा वापर करीत गावचा विकास साधला पाहिजे.मात्र गावचा विकास साधत असताना विविध समस्यांनाही सामोरे जावे लागते.  प्रशासनातले काही अधिकारी सरपंचाना न विचारताच परस्पर निर्णय घेतात.त्यामुळे सरपंच अडचणीत येवून ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागतो.अशावेळे तालुक्यातील सरपंचाची संघटना होण्याची गरज होती. ती आता पूर्ण झाली असून संघटनेने गावच्या विकासाची चर्चा गावात करून प्रश्न मार्गी लावावेत. विकास कामत निधी कमी पडू देणार नाही.असे अश्वासन त्यांनी दिले.
       यावेळी लोहारा तालुका सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी माकणीचे सरपंच विठ्ठल साठे तर उपाध्यक्षपदी तावशीच्या सरपंच उज्वला दंडगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आमदार चौगुले यांनी निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बस्वराज माशाळकर यांनी केले.तर आभार सरपंच मुक्ताबाई भोजने यांनी मानले.या कार्यक्रमास सरपंच मोहन पणुरे(जेवळी),सरपंच राम मोरे(हिप्परगा रवा),सरपंच विठ्ठल साठे(माकणी),
सरपंच सुनिल सुलतानपुरे(आष्टा का),सरपंच भाग्यक्षी जाधव,शिध्देश्वर गव्हाळे(खेड),बबन फुलसुंदर
(वडगाव गां),सरपंच आल्ताप पटेल(दस्तापुर),सरपंच उज्वला दंडगुले(तावशी),ग्रामसेवक देविदास कुर्ले, नारायण निंगशेट्टी,दत्तात्रय काळे,मुबारक मुल्ला,
हासीनाबी मुल्ला,यांच्यासह तालुक्यातील सरपंच व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post