उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान लोहारा अंतर्गत सास्तुर येथील ज्ञानेश्वर माऊली महिला ग्रामसंघास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद जिल्हा अभियान



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान लोहारा अंतर्गत सास्तुर येथील ज्ञानेश्वर माऊली महिला ग्रामसंघास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद जिल्हा अभियान संचालक डॉ.संजय कोलते यांनी दि. 20 मार्च रोजी भेट दिली.यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. कोलते म्हनाले की, गावस्तरावर महिला ग्राम संघांनी व्यवसायाची निर्मिती करून गटातील महिलांचे उत्पन वाढवून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यावर भर द्यावा तसेच शासनाच्या नव्याने सुरू झालेल्या अस्मिता योजनेमध्ये जास्तीत जास्त बचत गटांनी नोंदणी करून त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) अंतर्गत गावातील कृषी सखी यांनी तयार केलेल्या गांडूळ खत व अझोला पशुखाद्य प्रत्येक्षिकास भेट देवून पाहणी केली.व त्याबाबत माहिती जाणून घेतली.यावेळी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक गंगा सूरगीहळी,तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश,सरपंच यशवंत कासार,
अदि,उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक रमेश पवार,प्रभाग समन्वयक आनंद जानराव,विकास सुरवसे,कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर,सचिन गायकवाड,प्रदीप चव्हाण,अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास बचत गट महिला,कृषी सखी,पशु सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post