चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या लाभापासून दहा शिक्षकांना हेतुपुरस्सरपणे वंचित ठेवल्याणे होळीच्या दिवशी झाला शिमगा

मुर्तिजापूर  (प्रतिनिधी) पंचायत समितीच्या शिक्षिण विभागात भ्रश्टाचाराचा वणवा पेटला असून मोठया प्रमाणात बोकाळलेला भ्रश्टाचार वरपासून खालपर्यंत प्रामाणीक लोकांना त्रासदायक आणि तापदायक ठरत आहे. शिक्षण विभागात तर भ्रश्टाचाराची भूते जबर झााली असून शिक्षकांचे कोणतेही काम आणि कशाचेही काम हे देवाण घेवाण केल्याशिवाय होत नसल्याचा आणि त्याकरीता कामाचे रेट बोर्ड ठरल्याचा अंत्यत गंभीर आरोप शिक्षकांद्वारा केला जात आहे. प्राथमिक षिक्षकांची सेवा सतत 12 वर्श पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये ग्रेडनुसार वेतनवाढ होते. मुर्तिजापूर तालुक्यातील एकुण 46 षिक्षकांची सेवेत 12 वर्श
पूर्ण झाल्याने त्यांच्या वेतन श्रेणीत वरिश्ठांच्या आदेषानुसार  वाढ करण्यात आली परंतु यापैकी 36 षिक्षकांचे माहे जानेवारी 2018 च्या वेतनामध्ये वाढ करण्यात येवून इतर 10 लोकांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात आल्याने सदर प्रकार हा हेतुपुरस्सरपणे करण्यात आल्याचाा आरोप षिक्षकांद्वारा केला जात आहे.याबाबत शिक्षकांनी आज पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. होळीच्या दिवशी  शिक्षकांवर शिमगा करण्याची पाळी आली. संतप्त शिक्षकांनी सदर प्रकार हा देवाण घेवाणीचा असून आम्ही देवाण घेवाण केली नाही म्हणून आम्हाला मानसीक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे शिक्षक विशाल वैद्य, आष्विन बागडे, आतिषश तराळे, विजय हरणे आदींनी म्हटले आहे.



(46 शिक्षकांपैकी 10 शिक्षकांवर अन्याय करण्यामागील खरे कारण काय? या प्रष्नाचे उत्तर अधिका-यांनी दिले पाहिजे. शिक्षकांची पगार काढण्यापासून तर वेतनश्रेणीत वाढ लागू करण्यासाठी आर्थिक लुबाडणुकीचे प्रकार शिक्षकांच्या कार्य प्रणालीवर परिणाम करणारे ठरत आहे. पैशाविणा कामच होत नाही.

सुनिल पंडित 

तालुकाध्यक्ष कास्टाराइब शिक्षक संघटना )

                                                            (आपल्या कार्यात तत्पर आणि प्रामाणीक असलेल्या शिक्षकांना मानसिक त्रास देण्यामागील कारण देवाण- घेवाण हेच असून या प्रकरणाची सखोल चैकशी करून दोषींवर कारवाही झालीच पाहिजे. शिक्षणविभागातिल हा प्रकार वेळीस थांबला नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल.

-  सुधीर डांगे 

तालुकाघ्यक्ष शिक्षक  समिती )

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post