इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- काॅग्रेस व राष्ट्रवादी ने देशभरातील मुस्लीमांना भारतीय जनता पार्टीची भिती दाखवून मुस्लीम समाज व भाजपमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले.अनेक योजनांपासुन मुस्लीमांना मुख्य प्रवाहात अद्यापर्यंत येऊ दिलेले नाही.या पुढच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत अाहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी यांनी केले. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने काढण्यात अालेल्या संवाद याञेचे 10 मार्च रोजी उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर पाटी येथे अागमन झाले झाले होते.या प्रसंगी ते बोलत होते.या संवाद यात्रेत आलेल्या मान्यवरांचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सह साखर कारखान्याचे तज्ञ संचालक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी जमालभाई सिद्दीकी पुढे बोलताना म्हणाले कि,मुस्लीम समाजाने या पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे यावेळी त्यांनी सांगीतले. यावेळी प्रमुख म्हणुन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सरचटणीस एजाज देशमुख, संपर्क प्रमुख फादर इंगल्स,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतीक पटेल,भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष वाजिद शेख,भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबा शेख(लोहारा),
भाजप मिडिया सेल तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला
(लोहारा),शरीफ शेख,पसियोद्दीन मनियार,भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुसा औटी(उमरगा),जुबेर शेख,मुस्तफा पठाण,अदि उपस्थित होते.यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष रामदास कोळगे यांनी ही यावेळी अपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमास राजा भणगे,बालाजी भोयटे,किशोर कोळगे,बालाजी कोळगे,सरपंच दत्ता कस्पटे,अमरसिंह कोळगे, अनिकेत कोळगे,गणेश कोळगे,शेख गुरुजी,विष्णु डोलारे,नितीन शिंपले,भारत कस्पटे,हरीचाचा गव्हाणे,प्रितम काळे,शिवाजी अागळे,खाॅजाभाई पठाण,धर्मराज घोडके,पांडुरंग ढेरे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

