ग्रामपंचायत संगणक परीचालकांचा कामबंद आंदोलनाचा इशारा


अतुल नवघरे

  • मानधन न मिळाल्यास आंदोलन &  मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर


लाखपुरी :- थकीत मानधन व इतर मागण्या संदर्भात अकोला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परीचालक संघटनेनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. जिल्ह्य़ातील काही संगणक परीचालकांचे माहे डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर  २०१७ पर्यंत शासनाने सि. एस.पी. व्ही या कंपनीला पैसे देवुन सुध्दा संगणक परिचालकांचे मानधान दिले नाही.जिल्हात काही टिकाणी ऑपरेटराचे मानधान झाले परंन्तु २०० , ५०० , १००० , १५००,अशा स्वरुपाचे मानधान झाले आहे. शासनाच्या परिपत्रका नुसार ऑपरेटरला ६००० मासिक मानधान द्याला हवे असे नमुद असुन सुध्दा कंपनी त्यामध्ये कपात करत आहे. कंपनीला प्रत्येक ग्रामपांचायतीच्या सेन्टर मधुन १२४०० दर महिन्याला कपात होते परन्तु ऑपरेटर ला ते मानधान ६ ते ७ महिने विलंब करुन देतात ते पण कपात करुन केले जाते. ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णय नुसार ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राची व्यवस्थापन हे सिएससी एसपीव्ही या कपंनीकडे दिलेले आहे परंतू जिल्हा परिषद मानधन निधी कपंनीला देवुन सुध्दा कपंनीने ब-याच संगणक परीचालकांचे मानधन केले नाही .सदर प्रत्येक ग्रामपंचायतमधुन कॉम्पुटर , प्रिन्टर , दुरुस्ती साठी व टोंनर व रिंम करिता ग्रामंपचायती मार्फत कंपनीला पाठविला निधी पाठविला जातो पंरन्तु  डिसेंबर २०१७ पासुन एकाही ग्रामपंचायतीचे कॉम्पुटर स्पेअर पार्ट , किवा दुरस्ती अजुन सुध्दा करुन दिल्या गेली नाही . परन्तु कंपनीचे पैसे गोळा करण्याचे काम सुरु आहे व गावपातळीवर सर्व सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्या स्तरावर सरपंच , ग्रामसेवक व ऑपरेटर यांचे संयुक्त कार्यशाळा सि.एस.पी . एस.पी.व्ही यांच्या कडे शासनाने हि जबाबदारी दिली होती परंन्तु तालुक्या स्तरावर आजपर्यंत एकही प्रशिक्षण झाले नाही. याकडे  शासनाने ग्रभिर्याने लक्ष देण्याची गरज असुन भष्टाचारा कुठ तरि आळा बसेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार आपले सेवा केंद्र मध्ये लाईट व इंटरनेट ची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत ची आहे. परंतु जिल्ह्य़ातील  ब-याच ग्रामपंचायत मध्ये ती सुविधा अजुन पर्यंत उपलब्ध करून दिली नाही संगणक परीचालक स्वत खर्च करुन इतरत्र ठिकाणी किंवा जेथे इंटरनेट ची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व ऑनलाईन कामकाज करतो परंतु सहा - सहा महिने मानधन होत मानधान वेळेवर होत नसल्यामुळे उपासमारीची वेळ संगणक परिचालकावर आली आहे थकीत मानधन अदा करण्याकरीता जाणुन बुझुन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संगणक परीचालक संघटनेने केला आहे. ग्रामविकास विभागाकडून  ७ डिसेंबर २०१७ व २४ जानेवारी २०१८ रोजीच्या पत्राला जिल्हा परिषद प्रशासन व कपंनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवण्यात आली त्यामुळे जिल्ह्य़ातील संगणक परीचालकामध्ये नाराजी व्यक्त केली आहे वरील मागण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाहीत तर संघटनेने तर्फे काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असे निवेदनात नमुद केले आहे .ह्या सर्व मागन्या मान्य न झाल्यास ८-२-२०१८ पासुन कामबंद आदोलन , मिटींग किवा प्रशिक्षणाला हजर राहणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष अविनाश मातळे व उपाध्यक्ष अतुल आबुलकर यांनी दिला आहे.

शासनाने आमचा प्रश्न लवकर सोडवावा नाही तर आम्हाला कामबंद करावे लागेल . कंपनी ६ ते ७ महिन्यापासुन संगणक परिचालकांचे वेतन केले नाही . शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज. अविनाश मातळे (जिल्हा अध्यक्ष संगणक परीचालक संघटना अकोला 

जिल्हा परीषदने मानधन निधी सिएससी एसपीव्ही कपंनीला पाठवुन मानधन  केलेले नाही या बाबीवर कपंनी साफ दुर्लक्ष करीत आहे यावर लवकरात प्रशासनाने पाऊल उचलावे नाहीतर संघटने मार्फत आक्रम पवित्रा घेऊ
- अतुल आंबुलकर (जिल्हा उपाध्यक्ष संगणक परीचालक संघटना अकोला

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post