संत निरंकारी मिशन, शाखा-सावळज आणि ग्रामपंचायत,सावळज यांच्या संयुक्त विद्यमाने सावळज ता.तासगाव मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संत निरंकारी मिशन,सावळजचे महात्मा अनिल जाधव महाराज,सरपंच योगेश पाटील,ग्रामविकास अधिकारी हरी जाधव,मणेराजुरीचे जमदाडे आप्पा तासगाव तालुक्यातील संत निरंकारी मिशन मधील डाँक्टर,इंजीनिअर,वकिल क्षेत्रात काम करणारे,तसेच गावातील तिनशे स्वयंसेवक,,महिला,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी यांनी गावातील सर्व वार्डात स्वच्छता केली.गावातील सर्व गटारी,रस्ते,विशेषत: पाच आणि सहा नंबर वार्डातील प्लँस्टीक,कचरा चार ट्राँली स्वच्छ केला.या स्वच्छता अभियानाबद्दल सावळज ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
